प्रभाकर फौंडेशन एक स्वयंसेवी संस्था असून कंपनी अधिनियम २५ (१) अंतर्गत संस्थेची औपचारिक स्थापना २००६ साली ठाणे येथे करण्यात आली. शिक्षण व ग्रामीण विकास हे उद्देश समोर ठेऊन सौ नीला घाटे व श्री गिरीश घाटे यांनी संस्थेची स्थापना केली. ठाणे व सोलापूर जिल्ह्यातील अनेक समविचारी स्वयंसेवी संस्था आणि ग्रामीण शाळांसोबत संस्था काम करत आहे.
स्थापनेपासून संस्थेने सोलापूर व ठाणे जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. उदाहरणार्थ, माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण शाळांचा विकास करून २,५०० विद्यार्थ्यांचा फायदा झाला, शुद्ध पाणी पुरवठा उपक्रमात ६,००० विद्यार्थ्यांचा फायदा झाला, विना अनुदानित शाळांत पुस्तक वाटप उपक्रमात १०,००० विद्यार्थ्यांना फायदा झाला, यावली शाळेचा विकास या उवक्रमात २५० विद्यार्थ्यांना फायदा झाला, तसेच सौचालय बांधकाम, दुष्काळी काम, सोलर वीज पुरवठा, बंधारा बांधणी असे अनेक उपक्रम संस्थेने राबवले. या सर्व उपक्रमासाठी जवळपास रुपये १ कोटी हुन अधिक राशीचा विनियोग झाला, ज्याचे जवळपास २५,००० लाभार्थी आहेत..
संस्थेच्या कामी सढळ हाताने मदत करणाऱ्या दात्यांशी संस्था कायमची ऋणी आहे. काही संस्था व वैयक्तिक दाते संस्थेस वेळोवेळी मदत करत आले आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन, गवांदे कुटुंब, वाहेगावकर कुटुंब, कै विजयकुमार जोशी कुटुंब यांचा या ठिकाणी विशेषतः उल्लेख करणे आवश्यक आहे.
समाज कार्यात अनेक सेवाभावी संस्थांचा सहयोग लाभला आहे. पंधरा वर्षीय अनय गवांदे व त्याची बहीण रेणुका यांनी स्थापलेली बुक अ गिफ्ट, रॉयरी क्लब ऑफ ठाणे सबार्बन, प्रगती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य कृती समिती, सोलापूर सोशल फाउंडेशन यांचा आवर्जून उल्लेख करणे आवश्यक आहे.
श्री दादा चव्हाण, श्री मुकुंद मोहिते, श्री किशोर ढुरेपाटिल, यावलीचे माजी सरपंच श्री काकडे या सर्वांच्या सामाजिक बांधिलकी आणि अविश्रांत मेहेनतीनेच संस्थेचे सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण होऊ शकले. या सर्व कामात आमदार श्री दत्तात्रय सावंत सर यांचे संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद.
प्रेरणास्थान
भारतीय समाज क्रांतितील हरवलेले सोनेरी पान
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर (1867 - 1932) यांचा जन्म एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. स्वकर्तृत्वावर निजाम राज्यात ते मुख्य न्यायाधीश पदापर्यंत पोहोचले. केशवरावांची सामाजिक बांधिलकी आणि त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. समाजाची प्रगती साधायची असेल तर प्रथम सामाजिक जागृती आवश्यक आहे व शिक्षण हाच समाज जागृतीचा पाया आहे हा केशवरावांचा दृढ विश्वास होता. समाजात आमूलाग्र बदल आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रयत्न केले. तत्कालीन निजाम राज्यातील मराठी व हिंदू हृदयात त्यांनी आदराचे आणि प्रेमाचे स्थान मिळवले. भारतीय समाजक्रांतितील या हरवलेल्या सोनेरी पानाला माझा मानाचा मुजरा.
माझे पणजोबा केशवराव माझ्यासाठी सामाजिक बंधीलकीची जाणीव करून देणारे एक प्रेरणा स्थान आहे. त्यांचे पुरोगामी विचार आणि उमेद थोडेबहुत का होईना मला अंगिकारता यावे आणि समाजरूण फेडता यावे ही मी देवाचारणी प्रार्थना करतो. त्यांच्या अतुलनीय कार्याची छोटीशी ओळख करून देण्याचा मी इथे एक प्रयत्न करतो.
गिरीश घाटे
मानावतेतून परमार्थ साधन
श्री बळवंत राव गिरीराव घाटे (१९०२ - १९८९) यांचा जन्म पूर्वीच्या निजाम राज्यात एका सधन कुटुंबात झाला. बळवंत रावांची ओळख अण्णा साहेब किंवा अण्णा अशीच जास्त श्रुत आहे. लहानपणापासूनच अतिशय हुशार अशा अण्णा साहेबांनी वकिलीची पदवी संपादन करून निजाम राज्यातील न्यायव्यवस्थेत नोकरी पत्करली. वयाच्या पंचावन्नव्या वर्षीच निवृत्ती घेऊन अण्णा साहेबानी स्वतःला सामाजिक जीवनात झोकून दिले. वारकरी संप्रदायाच्या सेवेचा आणि सामाजिक बांधिलकीचा जणू त्यांनी ध्यासच घेतला. एकनाथ महाराज्यांच्या विचारांचा आणि वाङ्ममायाचा जनमानसात प्रचार करण्यात त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. प्रपंच आणि अध्यात्म यांचा योग्य मेळ जो अण्णा साहेबांनी आपल्या जीवनात साधला तो एकनाथ महाराजांच्या शिकवणीचे एक उत्तम उदाहरण म्हणून देता येईल.
अण्णा साहेब माझे आजोबा. संत तुकाराम म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तिर्थ व्रत || माझ्या वडिलांनी मिरासी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा || घरातच आदर्श असतांना दुसरी कडे शोध का घ्यावा? सामाजिक बांधिलकीचा वारसा मला मिळालाच आहे, तो पुढे नेण्याची पात्रता मात्र मला यावी हीच देवाचरणी प्रार्थना. अण्णा साहेबांच्या अतुलनीय कार्याची छोटीशी ओळख करून देण्याचा मी इथे एक प्रयत्न करतो.
गिरीश घाटे
घाटे गिरीश प्रभाकर