संस्थेचे नाव:
प्रभाकर फाउंडेशन
संस्थेचा प्रकार:
स्वयंसेवी संस्था
संस्थेची स्थापना:
कंपनी कायदा १९५६, विभाग २५ (१), १० फेब्रुवारी २००६
पॅन
AADCP8124G
१२(अ) अंतर्गत नोंदणी:
२८५/७७७/२००६-०७/१५२६. ता. १९ ऑक्टोबर २००६
८० G अंतर्गत नोंदणी:
ठाणे/AA-II/८०G/४४/२००८-०९/२६५०, ता. ४ डिसेंबर २००८
डायरेक्टर:
पत्ता:
युनिट १५, वर्धमान इंडस्ट्रीअल इस्टेट, ओल्ड आग्रा रोड, ठाणे ४००६०१, फोन : ९१-२२-२१७२१५१०
ठाण्याचे रहिवासी, श्री गिरीश घाटे हे गेले पंधरा वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. श्री घाटे यांनी ग्रामीण शिक्षण व विकास या उद्दिष्टाने २००६ साली प्रभाकर फाउंडेशन ची स्थापना केली.
श्री घाटे सोलापूर जिल्ह्यातील यावली या गावी गेली दहा वर्षे माध्यमिक शाळा चालवत आहेत. २५० विद्यार्थ्यांना या शाळेत दहावी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. पक्की इमारत, प्रयोग शाळा, वाचनालय, सभागृह, इत्यादी आद्य सोइनि युक्त अशी ही शाळा जिल्ह्यात एक आदर्श शाळांमध्ये गणली जाते. विना अनुदानित शाळांमधून शिकणाऱ्या नववी व दहावी च्या मुलांना मोफत पुस्तक वाटपाचा उपक्रम श्री घाटे यांनी सोलापूर जिल्ह्यात राबवला.
१६० शाळेतील जवळ जवळ १०,००० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील तीस हुन अधिक शाळांशी श्री घाटे संलग्न असून, शुद्ध पाणी व सांड पाणी योजना, सौचालय, पक्क्या इमारती, सोलार वीज अशा अनेक सुखसोई या शाळांना श्री घाटे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
महाराष्ट्र कृती समिती या संस्थेने ऑगस्ट २०१९ मध्ये श्री घाटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्र कृति समिती ही अखिल महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटना असून महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षण विकासात कार्यरत आहे.
श्री घाटे रोटरी संस्थेचे सक्रिय सभासद आहेत व त्यांच्या सामाजिक जीवनावर रोटरी तत्वांचा मोठा प्रभाव आहे. श्री घाटे यांची रोटरी तर्फे ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात सोलार वीज, बंधारे, व ग्रामीण शालेय विकास इत्यादी कामे उल्लेखनीय आहेत. 'रोटरी युथ एक्सचेंज' या आंतरराष्ट्रीय उपक्रमाची ठाणे जिल्ह्यात सुरवात करण्यात श्री घाटे यांचा महत्वाचा वाटा आहे.