प्रमुख कामे
शिक्षण हाच समाजाच्या उन्नतीचा पाया आहे. शिक्षण केवळ सक्तीचे करून पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांत शिक्षणाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. आपल्या शाळेचा विद्यार्थ्यांना अभिमान वाटला पाहिजे. प्रभाकर फौंडेशनने सोलापूर जिल्ह्यात दहा शाळा निवडून त्या शाळा सुंदर आणि आनंदी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मूलभूत गराजापूर्ती आणि शैक्षणिक पातळी उंचावण्याचा प्रयत्न संस्थेने केला. या प्रलकपास जवळपास २० लाख रुपये उपयोगात आणले, ज्याचा फायदा १० शाळांतील २,५०० विद्यार्थ्यांना झाला.
सोलापूर जिल्हा दुष्काळी असल्यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. येथे खोलवर बोर मारून पाणी मिळवण्याची जणू स्पर्धाच असते. या खोल बोरेवेल मधील पाणी क्षारयुक्त आणि जड असल्यामुळे पचनाचे व इतर अनेक आजार संभावण्याची शक्यता असते. शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने संस्थेने सोलापूर जिल्ह्यातील २५ शाळांमधून जल शुद्धीकरण केंद्रांची स्थापना केली. ही उपकरणे अद्यावत तंत्रज्ञानाने बनवली असून वाळू, कार्बन, रिव्हर्स ऑसमॉसिस व UV तंत्रांचा उपयोग करण्यात आला आहे. या प्रकल्पावर २० लाख रुपये खर्च करून २५ शाळांतील ६,००० विद्यार्थी व शिक्षकांना यातून फायदा मिळाला.
शासकीय शाळा व शासनाच्या अनुदानित शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांचे मोफत वाटप होते. परंतु विना अनुदानित शाळांमधून शिकणारे विद्यार्थी या पासून वंचित आहेत. प्रभाकर फाउंडेशनने ५वी ते १०वी मधील सोलापूर जिल्ह्यातील विना अनुदानित शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत क्रमिक पुस्तकांचे वाटप केले. ११ लाख रुपये खर्चून १६० शाळांतील १०,००० विद्यार्थ्यांना याचा फायदा करून देण्यात आला.
यावली या बार्शी तालुक्यातील छोट्याश्या गावात सन २००९ साली बळवंतराव घाटे प्रशाला या नावाने ही शाळा प्रस्थापित झाली. या शाळेच्या विकासाची जबाबदारी प्रभाकर फौंडेशनने हाती घेतली. गेल्या दहा वर्षात शाळेतील भौतिक सुखसोई आणि शिक्षणाच्या दर्जा यात अमुलाग्र बदल आणले. आज संपूर्ण तालुक्यात ही एक आदर्श शाळा म्हणून गणली जाते. ४० लाख रुपये खर्चून २५० विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.
इतर कामे
२०२० - आहार प्रकल्प
आहार प्रॉअल्पांतर्गत प्रभाकर फौंडेशनने कोविड सेन्टर मध्ये काम करत असलेल्या रेसिडेंट डॉक्टर्सना सात आठवडे सकाळच्या न्याहारीच्या रूपात सकस आहार पुरवला. हे कोविड सेन्टर ठाण्यात भायंदरपाडा येथे असून ठाणे महानगरपालिका हे सेन्टर चालवत आहे. रु. ७३,००० खर्च करून हा उपक्रम पूर्ण करण्यात आला. या कार्यक्रमास लागणारे अनुदान मिळवण्यात व हा कार्यक्रम योग्य रीतीने राबवण्यात डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सर्वतोपरी पुढाकार घेतला.
२०२० - कोविड-१९ साथीत बार्शी तालुक्यातील शिक्षकांना मदत
कोविड-१९ च्या साथीत लावलेल्या लोकडाऊन मध्ये विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक कुचंबणा झाली. बार्शी तालुक्यातील आशा ४० शिक्षकांच्या सहाय्यार्थ प्रभाकर फाउंडेशन ने १ महिना पुरेल एवढे धान्य वाटप केले.
२०१७ - ४५ घरास संलग्न - संडास बांधण्यात मदत
सरकारच्या स्वच्छ भारत योजने अंतर्गत सरकारने ग्रामस्थांना संलग्न सौचालय बांधण्यासाठी प्रत्येकी १,२०० रुपये देऊ केले. परंतु आधुनिक पद्धतीच्या सेप्टिक टाकीची सौचालये या निधीत बसत नाहीत. दूरवरचा विचार करून प्रभाकर फाउंडेशन ने प्रत्येकी ५,००० रूपये देऊन यावली गावात ४५ आधुनिक सौचालय बामधण्यास मदत केली.
२०१६ - यावली, तालुका बार्शी, सोलापूर - दुष्काळात मदत
सोलापूर जिल्ह्यातील बराच भाग दुष्काळग्रस्त आहे. २०१६ साली पडलेल्या दुष्काळात यावली गावी प्रभाकर फाउंडेशनने सार्वजनिक बोरवेल व पाणी साठ्याची व्यवस्था केली. ग्रामस्थ आणि गुरांच्या पाण्याची बरीच सोय यातून झाली.
२०१४ – यावली, तालुका बार्शी, सोलापूर - मारुती मंदिराची डागडुजी
सोलापूर जिल्ह्यातील यावली गावातील मारुती मंदिराची डागडुजी व पुनर्मिती प्रभाकर फाउंडेशनने केली. मंदिर गावाच्या वेशीवर असून ग्रामसभा, ग्रामस्थांच्या विश्रांतीची जागा आशा अनेक समाज कल्याणासाठी या मंदिराचा उपयोग होतो. २,५०० हुन अधिक ग्रामस्थांना याचा लाभ झाला.
२००९ – बदलापूर, ठाणे - बंधाऱ्यांची पुनर्बांधणी
प्रभाकर फाउंडेशनने बदलापूर येथे बंधारा बांधण्यास मदत केली. शेतीकाम आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे यासाठी या बंधाऱ्याच्या प्रामुख्याने उपयोग झाला. रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन या संस्थेने या प्रकल्पाची योजना आखली.
२००९ - भाटीपाडा, जव्हार येथे सोलार वीज प्रकल्प
भाटीपाडा या गावठाणात प्रभाकर फौंडेशनने सोलार विजेची व्यवस्था केली. भाटीपाडा हे ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक दुर्गम गावठाण. गावातील ३० घरातून विजपूरवठा, रस्त्यावरील दिवे इत्यादी या उपक्रमात समाविष्ठ होते. गावातील जवळ जवळपास २०० ग्रामस्थांना आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.