भारतीय शिक्षण हक्क कायद्यान्वये ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण अनिवार्य व ते मोफत असले पाहिजे. मर्यादित साधने आणि कायदा अमलात आणण्याची आवश्यकता हे दोन्ही लक्षात घेऊन सरकारने स्वयंसेवी संस्थांना ५वी ते १०वी चे वर्ग चालवण्याची परवानगी दिली. काही शाळांना सरकारने अनुदान देऊ केले, परंतु निधी अभावी बऱ्याच संस्थांना विना अनुदानित शाळा चालवणे भाग पडले. अनेक सोई ज्या अनुदानित शाळांना मिळतात त्या विना अनुदानित शाळांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ, पाठ्य पुस्तके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेतन, प्रयोग शाळा साहित्य, पाणी व विजेचा खर्च विना अनुदानित शाळांना मिळत नाही.
सोलापूर जिल्ह्यातच आशा १६० विना अनुदानित शाळा आहेत. आशा शाळांच्या भौतिक सुखसोई आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा आणि राज्यातल्या इतर अनुदानित शाळांपर्यंत त्यांचा शैक्षणिक दर्जा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुढे जाऊन या सर्व शाळांना सरकारी अनुदान मिळावे या साठी प्रयत्न करण्याचा आमचा संकल्प आहे. पंधरा वर्षीय अनय गावांदे व त्याची बहीण रेणुका यांनी स्थापलेली बुक या गिफ्ट सोबत हा कार्यक्रम राबवला.
महाराष्ट्र राज्य कृती समिती, अनय गावांदे पुरस्कृत बुक या गिफ्ट अ संस्थांना बरोबर घेऊन प्रभाकर फाउंडेशन ने एक आगळा उपक्रम हाती घेतला. सोलापूर जिल्ह्यातील १६० विना अनुदानित शाळांत शिकत असलेल्या जवळपास १०,०० विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके पुरवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. अनुदानित शाळांतील ५वी ते १०वी वर्गातील मुलांना पाठ्य पुस्तके मोफत मिळतात जी विना अनुदानित शाळांत मिळत नाहीत. प्रकल्प काटेकोरपणे आखण्यात आला. लागणाऱ्या पुस्तकांची यादी, वर्गवार विद्यार्थ्यांची नोंद, एकूण पुस्तकांची संख्या यांचे मोजमाप करण्यात आले. कॉर्पोरेट्स आणि शुभ चिंतक यांच्या देणग्यातून प्रकल्पाला लागणारे जवळपास ११ लाख रुपये उभे करण्यात आले. सरकारी छापखान्यातून पुस्तके खरेदी करून वर्गवार नोंदणीप्रमाणे प्रत्येक शाळेत पुस्तके पोहोचवली गेली. १६० शाळांमधील जवळपास १०,००० विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला. अभ्यासक्रम कायम असे पर्यंत ही पुस्तके प्रत्येक वर्षी वर्गात नवीन येण्याऱ्या विद्यार्थ्यांना परत वाटली जातील. आमदार श्री दत्तात्रय सावंत यांचे या प्रकल्पास मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
Taluka-wise list of beneficiaries for Std 5th to 8th :