घाटे प्रशाला, यावली
घाटे प्रशाला, यावली
शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम
श्री बळवंतराव घाटे प्रशालेची स्थापना १९८९ साली सोलापूर जिल्ह्यातील यावली या गावी झाली. शाळा पाचवी ते दहावी वर्गांसाठी असून जवळपास २५० विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. स्थापनेनंतर लवकरच शाळेस शासकीय अनुदान प्राप्त झाले परंतु शाळेत अनेक प्राथमिक सुखसोईंचा अभाव होता. शाळेत आमूलाग्र बदल घडवुन आणण्याच्या निर्धाराने प्रभाकर फौंडेशन ने २००९ साली शाळा दत्तक घेतली.
फौंडेशन ने शाळेत अनेक सुखसोईंची व्यवस्था केली. उदाहरणार्थ, शाळेसाठी पक्की इमारत, सौचालये, सभागृह, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, पाणीशुद्धीकरणासाठी RO फिल्टर प्लांट, इत्यादी.
प्रथम टप्प्यात पैशाअभावी अपूर्ण राहिलेलं शाळेच्या इमारतिचं बांधकाम आता परत सुरु करण्याचं प्रभाकर फौंडेशनने हाती घेतले आहे. बांधकामातील काही प्रमुख खालील प्रमाणे आहेत:
छज्याचे बांधकाम
सामूहिक व्हरांड्याचे बांधकाम
अपंग विद्यार्थ्यांसाठी उतार
दर्शनी चौकात छप्पर
बांधकामाचा तांत्रिक आराखडा बनवण्यासाठी योग्य संस्थेची नेमणूक केली जाईल. मालाची खरेदी व बांधकामावर प्रभाकर फौंडेशन जातीने देखरेख करेल. संपूर्ण कामास अंदाजे सहा महिने लागतील व अंदाजे ११ लाख रुपयांची तरतूद करावी लागेल.
यापैकी प्रभाकर फौंडेशन रुपये १.५ लाख स्वतः खर्च करेल व उरलेले रुपये ९.५ लाख भागीदार कंपनीच्या CSR फंडातून अथवा इतर अनुदानातून मिळवण्याचा प्रयत्न राहील.