श्री बळवंतराव घाटे प्रशाला या माध्यमिक शाळेची स्थापना १९८९ साली सोलापूर जिल्ह्यातील यावली या छोट्याशा गावात झाली. या शाळेत ५वी ते १०वी चे वर्ग चालतात आणि जवळपास २५० विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. शाळेस शासकीय अनुदान होते परंतु अनेक प्राथमिक सोईंची कमतरता होती. शाळा पत्र्याच्या खोल्यांतून भरत असे आणि बाक, दिवे, पुस्तकालय, प्रयोग शाळा, ईर्त्यादी अनेक सोइंचा अभाव होता. प्रभाकर फाउंडेशन ने २००९ साली या शाळेच्या विकासाची जबाबदारी हाती घेतली. शाळेत आद्यवत सुखसोइंची निर्मिती करून शाळेचे एका आदर्श शाळेत रूपांतर करण्याचा निर्धार प्रभाकर फाउंडेशन ने केला.
सर्वप्रथम शाळेसाठी एक पक्की इमारत बांधणे जरुरी होते. अनेक दात्यांच्या मदतीने एक ४,५०० चौरस फूट अशी अद्यावत पक्की इमारत बांधण्यात आली. इमारतीचे बांधकाम नोव्हेंबर २००९ मध्ये सुरू केले व इमारतीचे उदघाटन २९ जानेवारी २०११ रोजी करण्यात आले. इमारतीत सहा वर्ग, प्रयोग शाळा, पुस्तकालय, शिक्षक कक्ष, कार्यालय आशा खोल्या बांधण्यात आल्या. इमारतीच्या बांधकामाला जवळपास पंचवीस लाख रूपये खर्च आला.
वर्षामागे अजून अनेक सोईंची उपलब्धता करून देण्यात आली. शाळेसाठी एक सभागृह बांधण्यात आले. ही जागा मुलांना पोषक आहार देण्यासाठीही वापरली जाते. मुली व मुलांसाठी वेगवेगळ्या सौच्यालाये बांधण्यात आली. सौच्यालाय सांडपाण्याच्या अद्यावत सोयीने परिपूर्ण आहे. पिण्यासाठी व सांडपाण्याची बोरवेलची व्यवस्था करण्यात आली. या भागातील बोरवेलचे पाणी क्षारयुक्त आणि जड असल्याने पिण्यास योग्य नाही. १०० lpm क्षमतेचे जलशुद्धीकरणाचे उपकरण बसवण्यात आले. उपकरण अद्यावत तंत्रज्ञानाने बनवले असून, वाळू, कार्बन, RO व UV तंत्रांचा उपयोग करण्यात आला आहे. शाळेला इतर अनेक सोइ उपलब्ध करून देण्यात आल्या. उदाहरणार्थ, शाळेला तारेचे कुंपण, सोलर वीज, अद्यावत प्रयोग शाळा, खेळाचे साहित्य व मैदान, गणवेश, पाठ्य पुस्तके, इत्यादी सोइ नमूद करता येतील. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिकसकांचे प्रशिक्षण, शिक्षणात मागे पडणाऱ्या मुलांसाठी विशेष वर्गही सुरू करण्यात आले.
आज ही शाळा जिल्ह्यात एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला अली आहे.
जुनी शाळा
इमारतीचे बांधकाम
शाळेची नवी इमारत
शाळेचे सभागृह
खेळाचे मैदान
शुद्ध पाण्याची व्यवस्था